श्रीवर्धन । परतीच्या पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चक्रीवादळ यानंतर कोरोनाचे संकट आणि अवकाळी पाऊस. अशा या तिहेरी दोन्ही संकटामुळे इथला शेतकरी अक्षरशा रडकुंडीला आला आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व ठिक होते. चांगलं पीक डोलत होत. हा अवकाळी पाऊस आला आणि सर्व मेहनतीवर पाणी फिरवून गेला आहे. हाता तोंडाशी आलेला पीक अचानक नष्ट झाला आहे.
श्रीवर्धन तालुक्यात बहुताशी शेतकरी एकपीकी शेतीवर अवलंबून असतात. वर्षभर राबून भात, नाचणी सारखी पीक घेतली जातात. संपर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी कापुन ठेवलेल्या भात पीक मातीखाली गाडले गेले आहे. पेरणी, लावणीचा खर्च सोडाच मातीतून धुवून धुवून भाताचा दाणा वेचावा लागेल अशी परिस्थीती शेतकर्यावर आली आहे.
कोरोना, निसर्ग चक्रीवादळ यामुळे आधीच नागरिकांकडे पैशांची चणचण आहे. त्यात या नव्या संकटामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आधीच निसर्गवादळामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी, कर्जाची परतफेड कशी करावी व वर्षभर प्रपंच कसा चालवावा हा भला मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
-------------------------------------------
टाळेबंदीनंतर आलेला निसर्ग चक्रीवादळ यात अगोदरच बळीराजा भरडला गेलाय आणि आता या परतीच्या पावसामुळे बळीराजांच हातातोंडाशी आलेला पीक भुईसपाट होऊन शेतकर्यांचे अपरिमित असे नुकसान झाले आहे. याचा शासनाने विचार करावा व शेतकर्याला आर्थिक मदत करावी.
- अॅड. जयदीप तांबुटकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष, दक्षिण रायगड