पेण । पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने पेणकरांना दिलासा मिळाला होता. मात्र आज (14 ऑक्टोबर) पुन्हा नव्याने 32 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पेण शहरातील रुग्णांची संख्या जास्त आहे.
आज दिवसभरात 9 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. आजअखेर पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 755 झाली आहे. यापैकी 3 हजार 506 रुग्ण बरे झाले असून, 96 रुग्ण कोरोनाने दगावले. सद्यस्थितीत केवळ 153 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यामध्ये पेण नगरपालिका हद्दीतील 50 पुरुष व 34 महिला आणि पेण ग्रामीण भागातील 50 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे.
आज (14 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :