खोपोली : टँकरच्या धडकेनंतर कार कोसळली दरीत!

By Raigad Times    14-Oct-2020
Total Views |
 
Accident on mumbai_pune e
 
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ अपघात
  • सुदैवाने कारमधील तीनही प्रवासी बचावले
संदीप ओव्हाळ/खोपोली । मुंंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीकडे येणार्‍या एक्झिटला टँकरने दोन कारना जोरदार धडक दिली. या धडकेने एक कार दरीत कोसळली. सुदैवाने या कारमधील तीनही प्रवासी आश्‍चर्यकारकरित्या बचावले आहेत.
 
आज (14 ऑक्टोबर) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दररोज अपघाताची मालिका सुरु आहे. आज खोपोलीकडे जाणार्‍या एक्झिट टँकरने दोन कारना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन कारपैकी स्विफ्ट कार पुलावरुन खोल दरीत कोसळली.
 
Accident on mumbai_pune e
  
अपघातानंतर अपघातग्रस्त टिम, डेल्टा फोर्स आणि खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बाहेर काढले आहे. सुदैवाने कारमधील तीनही प्रवासी बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.