परतीचा पाऊस मुसळधार बरसला; भात, नाचणी; वरीची पिके धोक्यात

12 Oct 2020 19:23:11
 
परतीच्या पावसामुळे भुईसपा
खांब-रोहे/ नंदकुमार मरवडे : गेली आठ दिवस वातावरणातील प्रचंड उष्णता व ढगाळ परिस्थितीमुळे परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जित असतानाच दोन दिवस सतत मुसळधार स्वरूपात कोसळलेल्या परतीचे पावसाने शेती क्षेत्राला चांगलाच तडाखा दिला असून भाय,नाचणी व वरीची पिके धोक्यात येऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
 
मागील आठ दिवसापूर्वीही अशाचप्रकारे कोसळलेल्या परतीच्या पावसाने हजेरी लावून शेती व शेतकऱ्यांचे नुकसान केले होते.परंतू मागील आठवड्यापेक्षा आता दोन दिवसात मुसळधार स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे यावेळी मात्र फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.भारत देश हा क्रुषीप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवरच अवलंबून असल्याने शेती क्षेत्राचे नुकसान झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण होतो.
 
अगोदरच नैसर्गिक चक्रीवादळ व कोरोना महामारीने
सर्वांनाच मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असतानाच लागोपाठ दोन वेळा कोसळलेल्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतीक्षेत्राकडे लक्ष देऊन त्वरीत भात,नाचणी व वरी पिकांचे पंचनामे करून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊन शेतकरी वर्गाला संकटकाळात मदतीचा हात पुढे करावा, अशाप्रकारची प्रतिक्रिया रोहे तालुक्यातील धानकान्हे गावचे क्रुषीनिष्ठ शेतकरी पांडुरंग गोसावी यांनी आपली व्यथा मांडताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0