नालासोपाराः रस्त्यावर भुंकणार्‍या कुत्रीवर वस्तर्‍याने केले वार

By Raigad Times    12-Oct-2020
Total Views |
file photo_1  H
 
नालासोपारा : रस्त्यावर भुंकणार्‍या कुत्रीवर एका माथेफिरुन वस्तजयाने हल्ला केल्याची अमानुष घटना नालासोपारा येथे घडली. पशुकल्याण अधिकार्‍याने दिलेल्या तक्रारीवरून तुळिंज पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पूर्वेकडील शिर्डीनगर, गालानगर परिसरात एक कुत्री वारंवार भुंकत होती. त्याचा राग येऊन तस्लीम अन्सारी या माथेफिरूने त्या कुत्रीवर धारदार वस्तजयाने वार केले. त्यात कुत्रीच्या बरगड्यांना मोठी जखम होऊन तिचे पोट कापले गेले आहे.
 
ही घटना पाहिल्यावर आसपासच्या लोकांनी या कुत्रीच्या जखमेवर हळद टाकून प्रथमोपचार केले. मानद पशुकल्याण अधिकारी राजेश पाल यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राणीमित्र इशिका जैस्वाल हिच्या मदतीने या जखमी कुत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
 
रुग्णालयात डॉ. कुलदीप मुकणे यांनी गंभीर जखमी कुत्रीवर उपचार केले आहेत. याबाबत पाल यांनी गुरुवारी तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. त्यानुसार आरोपी तस्लीम अन्सारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.