नवी मुंबईत पान मसाला, तंबाखू, गुटखा विक्री करणारी टोळी जेरबंद

By Raigad Times    10-Oct-2020
Total Views |
 
navi mumbai police_1 
 
35 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई गुन्हे शाखेची कामगिरी !
 
नवी मुंबई : नवी मुंबईत विक्रीसाठी आणलेला लाखों रुपयांचा गुटखा, 3 टेम्पो आणि 1 आयसर गाडीसह चार आरोपींना नवी मुंबई गुन्हेने जेरबंद केले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कारवाई केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी शुक्रवारी सीबीडी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
पान मसाला व तंबाखू गुटखा विक्रीस बंदी असताना नवी मुंबईत रबाळे एमआयडीसी मधील सिल्वर हॉटेल येथे येत असल्याची माहिती कोकण विभाग अन्न व औषध विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. या सापळ्यात अडकलेल्या टोळीकडून 1 टेम्पो 1, बोलोरा 1 व्हीको व्हॅन असे 14 लाखाची वाहने आणि 35 लाख 53 हजार रुपये किमतीचा गुटखा सर्व मिळून 49 लाख 53 हजार 312 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला.
 
अन्न व औषध विभागाचे निरीक्षक व्यंकट हनुमंतराव चव्हाण यांनी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर नवी मुंबई गुन्हे शाखेने कोपरखैरणे येथील जितेंद्र कार्तिकचंद्र दास (वय 26 ) आखाय बुद्धदेव खंडा(वय 22 ),प्रियव्रत अभयकुमार दास(वय 29 ) आणि मुन्ना जनार्धन यादव (वय 28 )या चौघांना अटक केली आहे. सदर आरोपींला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 12 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
 
नवी मुंबई पोलीस अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सदर कारवाई केली.पोलीस सहआयुक्त डॉ जय जाधव , गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ बी जी शेखरपाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण उपस्थित होते.