महाड | महाड शहरासह ग्रामीण भागात स्मार्टमीटरच्या सक्तीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर चढू लागला आहे. या वाढत्या तक्रारींचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (शुक्रवार) दि. २५ जुलै रोजी आक्रमक पवित्रा घेतला. शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकातील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकार्यांना जाब विचारला आणि लेखी निवेदन सादर करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
खोपोली | साजगाव गावातील युनिव्हर्सल इस्टेटमध्ये रसायनांचे उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनी आहे. या कारखान्यात ज्वलनशील रसायनाच्या प्रदूषणामुळे ताकई गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. २५ जुलै रोजी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदुषणामुळे त्रास झाल्यामुळे ताकई गावातील तरुणांनी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेण्याचे एशासन कंपनीने दिले.
अलिबाग| उमाजी म. केळुसकर| महाराष्ट्राच्या इतिहासात ‘रायगड किल्ल्या’ला अनमोल स्थान आहे आणि त्याच्या पायथ्याशी वसलेले पाचाड गाव हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शिवछत्रपतींनी त्यांच्या लाडक्या मातोश्रींसाठी पाचाड येथे एक वाडा बांधून दिला. आजही या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात, पण ते केवळ ढासळलेल्या भिंती आणि कोसळलेल्या छपरांमधून दिसणार्या उपेक्षेची कहाणी सांगत आहेत.
धाटाव | राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षदी सुधाकर घारे यांची निवड करण्यात आली असून, हनुमंत जगताप यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक रविवारी (२७ जुलै) सुतारवाडी गीताबाग येथे पार पडली.
पाली/वाघोशी | सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या तीन गावांमध्ये रविवारी (२७ जुलै) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्यांची मालिका घडली. अज्ञात टोळीने धारदार शस्त्रांच्या धाकाने गावकर्यांच्या घरांमध्ये घुसून सोने, रोकड, बँकेशी संबंधित कागदपत्रे लंपास केली.
अलिबाग | अलिबागचे सुपूत्र, यशस्वी उद्योजक आणि निष्ठावान समाजसेवक गजेंद्र दळी यांचे रविवारी (२७ जुलै) वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अलिबागच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ‘ब्रह्मा विष्णू महेश सिनेप्लेक्स’चे संस्थापक म्हणून ते परिचित होते, तर त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते.
उरण | मासेमारी करण्यास शासनाची बंदी आहे. ही बंदी उठण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. असे असताना उरण येथील दोन बोटी एकाच दिवशी बुडाल्याची घटना शनिवारी घडली. एक बोट अलिबाग खांदेरी किल्ल्याजवळ तर दुसरी उरण तालुक्यातील मोरा बंदराजवळ पलटी झाली. दोन्ही बोटीत मिळून १४ खलाशी होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून तिघे बेपत्ता आहेत. दहा खलाशी पोहत किनार्यावर पोहचण्यात यशस्वी झाले.
महाड | युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांचा समावेश झाला ही आनंदाची बाब असून या सर्व गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन दुर्गराज ‘किल्ले रायगड’प्रमाणे करावे, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
उरण | अटल सेतू ते दिघोडे फाटा या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संतापलेल्या दिघोडेतील ग्रामस्थांनी शुक्रवारी (२५ जुलै) चक्क दिघोडे फाट्यावरील रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यातील चिखलामध्येच बसून आंदोलन केले. दिघोडे फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते जवळजवळ दीड तास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतील चिखलात बसून होते.
खोपोली | खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत होणार असून ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील, असा टोलाही गोगावलेंनी लगावला आहे.
अलिबाग | सुनील तटकरे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी दिसतील तेथेच त्यांना मारहाण करु, अशी धमकी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली असून सूरज चव्हाण यांचे हातपाय मोडण्याची दर्पो क्तीही करण्यात आली आहे. काय गुन्हे होतील ते होऊद्या, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि छावा संघटनेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
21.1k
रेवदंडा /कार्लई | मुरूड तालुक्यातील बारशिव गावाजवळ एका दुचाकीला कार चालकाने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, रेवदंडा पोलिसांनी त्याला रोहा चेक पोस्टजवळ अटक केली.
रेवदंडा | मुरूड तालुक्यातील प्रसिध्द फणसाड धरणामध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या अंधेरी - मुंबई येथील एका पर्यटकाचा बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई अंधेरी येथून अकरा जणांचा ग्रुप बोर्ली येथे पर्यटनासाठी आला होता. बोर्ली येथून रविवारी (दि. १३ जून) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण फणसाड धरण येथे पोहचले.
माणगाव | माणगावचे नाट्यगृह मंजूर होऊन तब्बल आठ वर्षे झाली तरी नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल नाट्यप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे ठिकाण मध्यवर्ती असून ते झपाट्याने विकसित होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक जडणघडणीचे केंद्र म्हणून पहिले जाते. या भागातील सांस्कृतिक चळवळीला अधिक वाव मिळावा, यासाठी आठ वर्षांपूर्वी माणगाव येथे नाट्यगृह मंजूर झाले होते.
माणगाव | शासनाच्या वतीने कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवत. ‘कायाकल्प’योजनेत भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अशा सुमारे ४४ शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
कोलाड | मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरून पुगांव नम्रता ढाबा ते गारभटकडे जाणार्या मार्गांवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य ठिकाणी झाडेझुडपे वाढली असून प्रचंड वाढलेल्या झाडांमुळे जणू रस्ताच हरवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली पहायला मिळते. गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अलिबाग | श्रीवर्धन तालुक्यातील गेले चार दिवस मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यामुळे धबधबा, धरण व तलाव तुडूंब भरुन वाहत आहेत. या ठिकणी कुठलही दुर्घना घडू नये यासाठी मान्सून कालावधीमध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारविणे येथील धबधब्यात एकाचा मृत्यू झाला होता.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील वांगणी, मोरवणे, घूम परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोरवणे गावातील दोन शेतकर्यांची गोठ्यात बांधलेली तीन वासरे, घूम गावातील एकाच शेतकर्याची दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत.
म्हसळा | तालुयातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अिेशनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल, गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण मिरगल यांची गाय अशी तीन गुरे गावाशेजारील जंगलात चरायला गेली असता वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने दगावली.
पेण | कार्यक्षेत्राबाहेर बेकायदा सावकारी करुन, दामदुपटीने लोकांकडून पैसे उकळत असल्याप्रकरणी पेण येथील दोन सावकारांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सहाय्यक निबंधक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पेण तालुक्यातील चिंचपाडा येथील सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्याकडे २०२२-२३ पासून पेण परिसरात सावकारी व्यवसायासाठी निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक रायगड यांचा परवाना आहे.
पेण | पीओपी मूर्तीमूळे प्रदूषण किती होते? याचा शोध कोणीही घेऊ शकले नाही. अजूनही विरोधक आमच्या हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांच्या विरोधात वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. मात्र ह्या विरोधकांना आम्ही पुरुन उरु, असा इशारा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी शिथिल केल्याबद्दल हमरापूर विभाग गणेश उत्कर्ष मंडळातर्फे पेण तांबडशेत येथे शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पनवेल | नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडी आणि मध्य प्रदेशातून आणलेला तब्बल ३ कोटी ७७ लाख २८ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ कंटेनर आणि ४ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर गुटख्याचा साठा कोठून आणला? आणि कोठे विक्रीसाठी नेला जाणार होता? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पनवेल । पनवेल आणि अलिबाग या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला फुटीचे ग्रहण लागले. पक्ष नेतृत्वाच्या घरातले सदस्य भाजपा मध्ये गेले त्याचबरोबर पनवेलला ही मोठा फटका बसला. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पनवेल या ठिकाणी ७८ वा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. २ ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील पोलीस मैदानावर पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सुधागड-पाली | पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात २० जुलै रोजी दुपारी रोशन सत्यवान पवार हा आदिवासी तरुण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी आला होता. मात्र यावेळी येथे एकही डॉटर उपलब्ध नव्हता. अडीच ते तीन तासांनंतर खवली येथील डॉटरांनी येऊन या तरुणाला तपासले व इथे उपचार करणे शय नसल्याचे सांगून या तरुणाला जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले.
कर्जत | माथेरान पर्यटन स्थळी येणारे पर्यटक विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटनासाठी जात असतात. त्यांच्याकडे असलेले खाऊचे रॅपर आणि प्लास्टिक बॉटल तसेच पावसाळा असल्याने वापरले जाणारे रेनकोट हे जंगल भागात कुठेही फेकले जात आहेत. दरम्यान, या प्लास्टिक कचर्याकडे माथेरान नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने जंगल भागात असे प्लास्टिक ही जंगलाचा र्हास करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
कर्जत | कर्जत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींकरिता २०२५ ते २०३० या कालावधीसाठी थेट सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. ५५ पैकी २८ ग्रामपंचायती या महिला वर्गासाठी राखीव असून पोशीर आणि अंजप या ग्रामपंचायतींचे प्रश्न नवीन आरक्षणानंतरही कायम आहेत.
पोलादपूर | आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून, सुरुवातीपासूनच पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पोलादपूर | ओंबळी धनगरवाडीतील महिलेला १०८ ऐवजी १०२ रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणताना महिलेची रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती होऊन तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची रूग्णांप्रती अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएससीने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात एका हायड्रा चालकाने ट्रॅफिक पोलीस गणेश पाटील यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हायड्रा चालकाना अटक केली आहे. गुरुवारी (२४ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
नवी मुंबई | कॉलेज तरुणासोबत एका विवाहितेचे सूत जुळले, याची कुणकूण नवर्याला लागल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. अडीच वर्षे हे सुरु होते. शेवटी नवर्याने बायकोच्या प्रियकराच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
मुंबई | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.६ ते ४.३ मीटर तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून देण्यात आला आहे.