पेण | पेणच्या सामाजिक आणि व्यापारी इतिहासाशी जोडलेल्या ब्रिटिशकालीन ‘भुंडा पुला’च्या जागी तरणखोप-पेण मार्गावरील भोगावती नदीवर उभारण्यात आलेल्या सुमारे १०० मीटर लांबीच्या आधुनिक पुलाच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
माणगाव | माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या रविवारी, ४ ऑटोबर रोजी पुन्हा गंभीर झाली. मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावर माणगाव शहरापासून ढालघर फाट्यापर्यंत सुमारे सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ झाली. रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने पादचार्यांनाही मार्ग काढताना मोठ्या
कर्जत | सप्टेंबरच्या अखेरीस मोठा पाऊस झालेला नसतानाही उल्हास नदीचे पाणी गढूळ आणि लालसर झाल्याने उल्हास नदी बचाव कृती समितीने नदी परिसराची पाहणी करून गाळाच्या स्रोताचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
रोहा | रोहा तालुक्यातील बारसोली गावाच्या वळणावर टँकर मागे घेत असताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
म्हसळा | म्हसळा तालुक्यात दरवर्षी सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
माणगाव | संसदेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १०, असे एकूण ३१ सदस्य असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्राला मोठे महत्त्व आहे.
पनवेल | पनवेल तालुक्यातील नानोशी गाव परिसरात सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. नानोशी गाव परिसरात भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात आली.
अलिबाग | १५ व्या वित्त आयोगांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या ५२ कोटी ७२ लाख ८० हजार ९९० रुपयांच्या निधीच्या सुधारित विकास आराखड्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांसाठी प्रत्येकी ३० टक्के, तर इतर मूलभूत विकासकामांसाठी ४० टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे.
अलिबाग | शिक्षकाच्या बदलीच्या प्रकरणात दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश भस्मे (वय ४६) यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (२३ सप्टेंबर) रंगेहाथ पकडले.
पनवेल | मुंबईतून कॅबने पनवेलला परतणार्या महिलेबरोबर कॅबचालकाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने कॅब थांबवून चालकाने महिलेचा हात पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रसंगावधान राखत कॅबमधून बाहेर पडून आपली सुटका करून घेतली.
अलिबाग | स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही वीजेपासून वंचित असलेल्या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या खुटेगाव या आदिवासी वाडीपर्यंत अखेर वीज पोहोचली आहे. अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या या वाडीतील घरांमध्ये पहिल्यांदाच विजेचा दिवा पेटल्याने ग्रामस्थांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे.
कोर्लई | राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे साळाव-मुरुड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, नांदगाव येथील नागेेशर नगर ते आयुष हॉस्पिटलदरम्यान साईडपट्टी भराव करताना रस्त्यावर आलेली खडी-माती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तळा | महागाव पंचक्रोशीतील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’चे हे विद्यार्थी होते. अकॅडमीच्या ४८ जणांचा ग्रुप येथे सहलीसाठी आला असताना ही दुर्घटना घडली.
श्रीवर्धन | शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही व्यापारी पर्यावरणाची काळजी घेत ग्राहकांना कापडी किंवा कागदी पिशव्या देत असले, तरी काही दुकानदारांकडून ग्राहकांना खुलेआम प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
म्हसळा | म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना शिंदे गटाच्या उपनगराध्यक्षा कमल रविंद्र जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिले आहे. नगराध्यक्ष सुनील शेडगे यांच्याकडे राजीनामा सादर केल्याचे समजते.
पेण | गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. मूर्ती कारखान्यांमध्ये अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला आहे. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभरात लौकिक असलेल्या पेणमधून सुमारे ३० लाख गणेशमूर्तींची विक्री झाली असून यातून साधारण १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पनवेल | आठ वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.
सुधागड-पाली | पाली-खोपोली महामार्गावरील रासळ आणि कानसळ परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, या गुरांनी महामार्गावर अक्षरशः ठाण मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध कळपाने गुरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील चिलार नदीवर प्रस्तावित शिलार धरणाला माझा १०० टक्के विरोध असून, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिलार धरण जनआंदोलन समितीला दिले.
खालापूर | अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तंबाखू व खाऊ आणण्यासाठी घरी बोलावल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली.
खोपोली | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाचा चौथा मुक्काम शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी खोपोलीत होणार आहे. यासाठी ताकई येथील धाकटी पंढरीच्या मैदानात हजारो आंदोलकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीवर्धन | बेरोजगारी आणि आरोग्यसेवेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ गाव आगरी युवा संघाच्या वतीने खारगाव बुद्रुक ते दिघी पोर्टदरम्यान बाईक रॅली काढण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याचा आरोप करत संघटनेने ‘आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’ असा नारा देत सरकारचे लक्ष वेधले.
उरण | ओएनजीसीच्या न्हावा सप्लाय बेसमधील पाईप व अन्य साहित्य गुजरातमधील पिपावाव येथे हलविले जात असून, ४०० हून अधिक ट्रेलर गुजरातकडे गेल्याचा दावा कामगारांनी केला आहे. त्यातच सप्लाय बेसवर काम करणार्या कंत्राटी कामगारांना कमी केल्याने बुधवार (१६ सप्टेंबर) पासून या कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले
महाड | महाड व पोलादपूर तालुक्यांत अपुर्या पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, दोन्ही तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाडच्या प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
महाड | स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणार्या किल्ले रायगडावरील शिवसमाधी, मेघडंबरी आणि राजसदर परिसर गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असल्याची बाब समोर आली आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील लोहारे-देऊळकोंड येथे जन्मदात्या बापानेच आपल्या २३ वर्षीय मुलाच्या छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) घडली. साई सचिन चिकणे असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन चिकणे आणि त्यांची पत्नी संध्या यांच्यात वाद झाला.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
नवी मुंबई | नवी मुंबईत चेन स्नॅचिंग, घरफोडी,जबरी चोरी आणि अंमली पदार्थ तस्करी असे विविध २३ गुन्हे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी उघडकीस आणले असून याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १८ लाख ४२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई | चार वर्षांची सेवा पूर्ण करून राज्यात परतणार्या अग्निवीरांना राज्य शासनाच्या गट-कमधील गणवेशधारी सेवांच्या भरतीमध्ये १० टक्के समांतर आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच माजी अग्निवीरांना शासकीय आणि निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नवीन पनवेल | वाहनावर ट्रॅफिक चलन झाल्याचा बनावट मेसेज पाठवून त्यातील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडत कळंबोली येथील नागरिकाची ५ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.