पनवेल | खारघर शहरातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेद्वारे चालणारी इलेट्रिक बस सेवा गेल्या काही दिवसांपासून अपुर्या चार्जिंग सुविधांमुळे वारंवार ठप्प होत असून नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस वेळेवर चार्ज न झाल्याने निर्धारित वेळापत्रकानुसार फेर्या राबवल्या जात नसल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. नागाव येथे सहा जणांना जखमी केल्यानंतर फसार झालेल्या बिबट्याने शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी आक्षी येथील साखर परिसरात दोन जणांवर हल्ला चढवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नागपूर | राज्यात पापलेट (सिल्वर पॉम्फ्रेट) मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ५५ मेट्रिक टनांची वाढ झाली असून, हे संवर्धनात्मक उपाययोजनांचे यश असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शुक्रवारी (१२ डिसेंबर) विधानसभेत निवेदन करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाश्वत मासेमारीसाठी लहान माशांची पकड रोखण्याच्या उद्देशाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी ५४ प्रजातींसाठी किमान कायदेशीर आक्रमण निश्चित केले आहे.
नागपूर | राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि, कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
नागपूर | राज्यातील महिला स्वयंसाहाय्यता गटांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी सरकारने २०० कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
नागपूर | लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत राज्यातील ९८ हजार ९५७ अपात्र नागरिकांनी सरकारची तब्बल १६५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.
नागपूर | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अजूनही गेल्या आठ वर्षांपासून ६ लाख ५६ हजार शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रायगड पोलीस मुख्यालयात १ ७८ कोटींचा घोटाळा, पोलीस पाटलांच्या मानधनावर कनिष्ठ लिपिकाचा डल्ला
नागावनंतर आक्षीमध्ये बिबट्याचे हल्ले, दोनजण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अलिबाग । रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्यासह सर्व 21 जणांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अलिबाग येथील सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते.
उरण । उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले, तर नागावसह आसपासच्या वस्त्यांमध्ये घरांच्या काचा फुटल्या व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
मुरुड जंजिरा । मुरूड जंजिरा नगरपरिषद निवडणूकी दाखल अर्जांपैकी 1 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदासाठी दाखल 12 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 5 तर 74 नगरसेवक पदासाठी करिता अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफल यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले होते.
मुरुड । जिल्ह्यातील मुरूड काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (8 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक शैक्षणिक सहलीसाठी काशीद बीचवर आले होते.
ताम्हणी | माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ घडली असून, कारच्या सनरुफवर दगड कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.
गोरेगाव | राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील गोरेगावात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विकास दादा गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
रोहा | पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने घरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रोह्यात घडली आहे. १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर या काळात घरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
रोहा । तटकरेंचे होमग्राऊंड असलेल्या कोलाड नाक्यावर शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर अक्षरशः हल्लाबोल केला. 20 वर्षे उपभोगले तरी सर्व मलाच...मुंबई- गोवा महामार्ग त्यांच्यामुळेच रखडला, असा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
श्रीवर्धन | भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर एका इसमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धनमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्टसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्या लहान मुलीला भुताने झपाटले आहे असा समज तिच्या आईचा झाला होता.
श्रीवर्धन । यावर्षी कोकणातील पावसाळ्याने विक्रमी सुरुवात केली. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी 20 मे रोजीच पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथील वृध्द दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. म्हसळा पोलिसांनी या खूनाचा उलगडा पोलिसांना केला असून दोघांना अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
म्हसळा | तालुक्यातील खरसई गावातील भावेश जनार्दन म्हसकर यांनी शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) उदयपूर येथे पोहोचला आहे.
पेण | पेणखोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून रविवारी (२ डिसेंबर) रात्री पुन्हा एकदा भीषण अपघाताने परिसर हादरला. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळील हॉटेल टिक्का समोर वेगाने धावणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
बेणसे । केंद्रात आणि राज्य भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची गट्टी असली तरी रायगडात मात्र कट्टीचे चित्र कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला युतीचा फॉर्म्युला खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळून लावल्यानंतर मंत्री गोगावले यांनी तटकरेंना आमनेसामने लढण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे.
पनवेल | शेजारणीच्या जाचाला कंटाळून कुमकुम कौर या बावीस वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिचा मित्र संदीप याला पाठविलेल्या ऑडिओमध्ये ही बाब पुढे आली आहे. उलवे येथे राहणार्या कुमकुम बलविंदर कौर या तरुणीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली होती.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
कर्जत | आरपीआय आठवले गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून याबाबची तक्रार डाळींबकर यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे केली आहे.
कर्जत । साधी कच्ची घरे, मजुरी आणि शेतीवर चालणारं आयुष्य...नयन वाघ हा तरुणदेखील हेच आयुष्य जगत होता....दहावीत तो सलग तीन वेळा नापास झाला...अपघातामुळे पोलीस भरतीत उतरण्याची संधी हुकली होती.
खोपोली । खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननी प्रक्रिया चांगलीच रखडल्याचे पहायला मिळाले. या नगरपालिकेत प्रमुख राजकीय पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आला.
वावोशी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे खालापूर टोल नाका परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
उरण | उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण केणी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी दली. नागाव ही उरण तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते.
उरण | उरण शहर कोणाचीही जहागिरी नाही. शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर त्यांना बळ देणे हे माझे कर्तव्य आहे. कितीही विरोध झाला तरी शिवसेनेच्या विस्तारासाठी मी आग्रही राहणार, अशा शब्दांत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपावर निशाणा साधला.
महाड | महाडमध्ये मतदान केंद्राबाहेर आपापसात हाणामारी करणार्या, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांचाही समावेश आहे.
महाड । महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननीच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दाखल संकेत वारंगे आणि अनिकेत अनिल कविस्करहे दोन अर्ज बाद झाले. तर नगरसेवक पदासाठी दाखल अर्जापैकी 25 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको मंडळाने अधिसूचित केलेल्या रायगड जिल्ह्यातील सुमारे ६० हेक्टर ९५ गुंठे जमिनीच्या मालकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने सखोल चौकशीचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई | नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर आक्षेपांची मालिका सुरू झाली असून आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती नोंदविण्याची मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत होती; मात्र ती वाढवून ३ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
मुंबई । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचे वितरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या हप्त्यामुळे राज्यातील शेतकर्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.